प्राथमिक शिक्षण: ‘ग्रामीण व शहर: उणे व अधिक’

एकदा आमच्या स्नेहींना घेऊन आम्ही एकांच्या शेतघरावर गेलो होतो. त्यांची मुले ही पूर्णपणे शहरात वाढलेली. गाव, माळरान, शेती, शेतघर आणि एकूणच निसर्गापासून नेहेमीच लांब. शेतात फिरताना त्यांच्या शेंडेफळाचे आश्चर्यजनक उदगार कानावर पडले.

“OMG! Look! Somebody has stuck tomatoes on that plant!”

पाच वर्षाच्या मुलाची ही उक्ती ऐकून प्रचंड खसखस पिकली होती.

उलटपक्षी एकदा कधीकाळी अगदी खेडेगावच्या मळलेल्या रस्त्याने चारचाकीने जात असताना ती गाडी एक स्त्री चालवत असलेली बघून, काहीतरी अत्यंत अघटीत घडलं/पाहिलं असावं अश्या प्रकारे डोळे विस्फारून एक ७ – ८ वर्षांचा छोटा मुलगा, “बाई! बाई! बाई चालवतीये बघ!” असे आश्चर्योद्गार ऐकल्याचंही स्पष्टपणे आठवतंय

या दोन्ही उदाहरणांवरून, शहरी आणि ग्रामीण शिक्षण किंवा अनुभव यातील दरीच अधोरेखित होते.

प्रत्यक्षदर्शी किंवा. “Hands on” शिक्षणाचा दोन्ही वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये असलेला अभाव यामुळे जाणवतो. आणि दोन्हीकडे तो किती महत्वाचा आहे हे देखील पटकन लक्षात येते.

शहरापासून खूप दूर, जिथे बहुदा दिवसातून एक किंवा दोनच एस.टी गाड्या पोहोचतात, किंवा क्वचित काही खेड्यांमध्ये त्याही नसतात.

जिथे चावडी, ग्राम पंचायतीचे ऑफिस, गुरांचा दवाखाना, कडबा कुट्टी केंद्र, भात कांडणे, धान्याचे पीठ दळणे किंवा तेलबियांपासून तेल काढणे या कामासाठी लागणाऱ्या गिरण्या; यांची प्राथमिकता शाळेपेक्षा वरची असते, अशा ठिकाणी अर्थातच शाळेकडे दुर्लक्ष केले जाते.

अशा ठिकाणी शिक्षकांच्या पदरी देखील बहुतांश वेळा हेटाळणी आणि निराशा येते.

अशा खेड्यापाड्यांमध्ये शिक्षणाचे महत्त्व हे जाणलेच पाहिजे.

आधुनिक ज्ञान – विज्ञान आणि तंत्रज्ञान खेड्यापाड्यातल्या मुलांपर्यंत पोचणं हे अनिवार्य आणि अत्यंत महत्त्वाचे झाले आहे.

ग्रामीण भागात ही technology पोहोचणे किती आवश्यक आहे हे गेल्या २ वर्षात आपल्याला अर्थातच Covid ने दाखवून दिले.

ग्रामीण आणि शहरी भागातील मुलांना वेगवेगळ्या प्रकारचा Hands On experience दिला गेला पाहिजे.

ग्रामीण भागात इंग्रजी भाषा शिक्षण हे खूप आधी पासून देणे गरजेचे झाले आहे, कारण शेवटी technology ची भाषा इंग्रजी आहे. ती लिहिता – वाचता येऊ लागली की मुलांना mobile हाताळणे, apps वापरणे हे शिकता येते. सध्या, निदान शालेय शिक्षण online असे पर्यंततरी हे फार महत्वाचे आहे.

तसेच शहरी भागातील मुलांना शेत, नांगर, फळे आणि भाज्या पिकवणे, भात कांडणे म्हणजे काय? तुमच्या fridge मध्ये जो भाजीपाला दिसतो तो कुठन येतो, कसा येतो आणि त्यासाठी किती कष्ट लागतात आणि किती वेळ द्यावा लागतो याचे ज्ञान देणे आवश्यक आहे.

पण हे सगळे व्यवस्थितपणे पार पडणे ही दोन्ही गटातील शिक्षकांसाठी मात्र तारेवरची कसरत ठरणार आहे.

आणि सक्षम फाउंडेशन यात सगळ्या शिक्षकांच्या (विशेष करून ग्रामीण भागातील) पाठीशी उभे राहण्याची खात्री देते.

मुले ग्रामीण भागातील असो व शहरातली त्यांचे भविष्य उज्ज्वल असले पाहिजे हाच आमचा ध्यास.

‘Teachers have always been guardian angels for their students and we strive to help both of them.’

या मुलांना पाहून प्रसून जोशी यांच्या ओळी आठवतात..

जैसे आँखों की डिबिया में निंदिया

और निंदिया में मीठा सा सपना

और सपने में मिल जाए फरिश्तासा कोई

जैसे रंगों भरी पिचकारी

जैसे तितलियाँ फूलों की क्यारी

जैसे बिना मतलब का प्यारा रिश्ता हो कोई

ये तो आशा की लहर है

ये तो उम्मीद की सहर है

खुशियों की नहर है

खो ना जाएँ ये..

तारे ज़मीं पर!!!

 

About the Author

You may also like these

No Related Post