A Chocolaty Experiment! -The Marsh Mellow Theory

एक चॉकलेटी प्रयोग !

एकदा एका शिक्षकाने वर्गातल्या सर्व मुलांना चॉकलेटं वाटली

मात्र, ती खाण्याआधी त्यांनी एक अट घातली.

ते म्हणाले,”मी १० मिनिटात मुख्याध्यापकांना भेटून येतो. पण तो पर्यंत कुणीही हातातले चॉकलेट खायचे नाही”

चिमुकल्यांसाठी अत्यंत अवघड अशी ही गोष्ट

वर्गात एकदम शांतता. प्रत्येक मूल स्वतःच्या व आपल्या मित्र – मैत्रिणींच्या हातातल्या चॉकलेटकडे अत्यंत आशाळभूत नजरेने पाहात होते आणि स्वतःला ते खाण्यापासून थांबवायचा प्रयत्न करत होते

सांगितल्या प्रमाणे १० मिनिटांनी शिक्षक वर्गात परतले.

फक्त ७ मुलांच्या हातात त्यांना चॉकलेट दिसले

इतर मुलांच्या चॉकलेट का मिळाले आणि ते किती छान होते यावर गप्पा रंगल्या होत्या.

शिक्षकाने नकळतच त्या ७ मुलांची नावे त्यांच्या दैनंदिनी मध्ये लिहून घेतली आणि नंतर वर्गात वाचून दाखविली.

या शिक्षकाचे नाव

“प्रोफेसर वॉल्टर मिचेल” असे होते

पुढे बरीच वर्षे लोटल्या नंतर एके दिवशी प्रोफेसर वॉल्टर यांनी आपल्या डायरीतून ती ७ नावे शोधून काढली आणि आता ती मुले कुठे आहेत आणि काय करतात याचा ते शोध घेऊ लागले.

अथक प्रयत्नाने प्रत्येकाला त्यांनी शोधून काढले आणि त्यांच्या असे लक्षात आले की ते सातही विद्यार्थी आपापल्या क्षेत्रात आणि आयुष्यात अत्यंत यशस्वी आणि प्रतिष्ठित आहेत.

या चॉकलेटी प्रयोगा नंतरचे प्रोफेसर वॉल्टर यांचे हे वाक्य,

*”A man who can’t be patient for ten minutes can never move forward in life.”*

त्यांच्या या प्रयोगाला नंतर जगभरात मान्यता मिळाली व त्याला “Marsh Mellow Theory” असे नाव देण्यात आले कारण तेव्हा त्यांनी मुलांना Marsh Mellow नावाचेच चॉकलेट दिले होते.

फेसासारखे अतिशय मऊ आणि मुलांना अगदी आवडेल अशाच चवीचे हे चॉकलेट असते.

प्रोफेसर वॉल्टर यांच्यानुसार सहनशक्ती आणि चिकाटी हे गुण अंगी असणे अत्यंत महत्त्वाचे आहे. ते माणसाची ताकद वाढवतात व कठीण प्रसंगात त्याला नैराश्य येऊ देत नाहीत.

यामुळेच सर्वगुणसंपन्न असे व्यक्तिमत्त्व माणसाला लाभते.

अशेच नवीन प्रयोग आपल्या शाळांत होत असतात .ते शिक्षकांनी आमच्याकडे पाठवावेत , आम्ही #sakshamfoundation च्या page वर नक्की प्रसिध्द करु.

About the Author

You may also like these

No Related Post